लांजा पंचायत समितीची आमसभा २५ नोव्हेंबरला


रत्नागिरी, दि. १९ ) : लांजा पंचायत समितीची आगामी आमसभा येत्या बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
लांजा येथील कोर्लेरोड परिसरातील श्री पाटीदार भवन सभागृहात ही सभा पार पडणार आहे.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत या आमसभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या सभेत तालुक्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प आणि नागरिकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती गटविकास अधिकारी तथा आमसभेचे सचिव हिंदूराव गिरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button