बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त रत्नागिरी शिवसेनेतर्फे अभिवादन


रत्नागिरी : हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे श्री. प्रदीप (बंड्या शेठ) साळवी, शहरप्रमुख श्री. बिपिन बंदरकर, नगरसेविका सौ. प्रिती सुर्वे, नगरसेवक श्री. सौरभ मलुष्टे, श्री. राजू कीर, श्री. गणेश भारती, सौ. सायली पाटील, सौ. आफ्रिन होडेकर, सौ. निवेदिता कळबंटे, सौ. जागृती पिलणकर, सौ. मेघा कुलकर्णी तसेच नगरसेवक श्री. अभि दुडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच श्री. प्रथमेश साळवी, श्री. मनोज साळवी, श्री. रोहित मायनाक, श्री. विकास पाटील, श्री. नरेंद्र देसाई, श्री. नितीन लिमये, श्री. दुर्वेश पांगम, श्री. सर्वेश शेलार, श्री. विलास पुनसकर, श्री. सुनील शिवलकर, श्री. धनंजय नलावडे, श्री. प्रविण साळवी, श्री. रितेश सुर्वे, श्री. प्रकाश भाटये यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button