शासनाच्या अभय योजने अंतर्गत थकीत कुवारबाव पाणीबिल पुर्वव्रत करणे

कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्था सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (M.I.D.C.) वर अवलंबून आहे. सदर पाणीपुरवठा व्यवस्थेच्या अनुषंगाने शासनामार्फत अभय योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे.या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सदर योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडून थकीत पाणीपट्टीची रक्कम १२ समान मासिक हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
तसेच, उपलब्ध माहितीनुसार कुवारबाव ग्रामपंचायतीची एकूण आर्थिक थकबाकी अंदाजे रुपये ७५ लाख असून, त्यापैकी रुपये ३५ लाख इतकी दंडव्याज स्वरुपातील रक्कम माफ होणार असल्याचे समजते. त्यामुळे उर्वरित रु.४० लाख ग्रामनिधी मधून पाणीपुरवठा योजनेसाठी वर्ग करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी अथवा जिल्हापरिषदेकरून कर्ज घेऊन ही रक्कम भरण्यात यावी जेणेकरून १२ टक्क्या ऐवजी ४/५ टक्के व्याजदर भरता येईल.
सदर बाब ही ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत गरजेशी संबंधित असल्याने, या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमानुसार सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी कुवारबाव ग्रामपंचायत प्रशासक याना पत्र देण्यात आले या वेळी श्री.सतेज नलावडे,श्री.नितीश आपकरे,श्री.वैभव गराटे ग्रा.प.कर्मचारी राजू जोगळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button