६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ सोमवारपासून

रत्नागिरी, दि. १३ ):- शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ नोव्हेंबर २०२६ पासून महाराष्ट्रातील विविध २४ जिल्हास्तरावरील केंद्रांवर सुरू होत आहे. रत्नागिरी केंद्रावरील या नाट्य स्पर्धेचे उद्घाटन १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्यास आणि स्पर्धेतील सर्व नाटकांचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त नाट्यप्रेमींनी व प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. मराठी रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी आणि नव्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे विविध उपक्रम राबवले जातात. या नाट्य स्पर्धेने आपली ६५ वर्षांची गौरवसंपन्न आणि अविरत वाटचाल चालू ठेवली असून, याद्वारे अनेक प्रसिद्ध नाटककार, अभिनेते, तंत्रज्ञ व दिग्दर्शक घडले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button