रत्नागिरी तालुकास्तरीय वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात

रत्नागिरी :
रत्नागिरी तालुक्यातील वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या प्रशिक्षणास १३ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण २२ नोव्हेंबरपर्यंत दहा दिवस चालणार आहे.
रत्नागिरी शहरातील देव घैसास-कीर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
उद्घाटनप्रसंगी डायटचे अधिव्याख्याता राजेंद्र लठ्ठे, विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, विषयतज्ज्ञ अश्विनी काणे, भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर तसेच पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देत शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी अशा प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
वरिष्ठ गटासाठी मोहन बापट, श्रद्धा बोडेकर, प्रभात कोकजे, पोकळे, श्रीम. चिले आणि समीर पडवेकर हे सुलभक म्हणून कार्यरत आहेत. तसेच विषयतज्ज्ञ म्हणून दीपाली जंगम आणि वंदना गुरव, तर तांत्रिक सहाय्यासाठी श्रीनिवास जोशी उपस्थित आहेत.
दहा दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये पात्र शिक्षकांना त्यांच्या अध्यापन कार्यात अधिक प्रभावीपणे योगदान देता यावे, यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button