गोकुळचा डाव पलटला, कोल्हापूरात बंटी पाटलांना मोठा झटका!
छत्रपती संभाजीनगर : गोकुळच्या शासननियुक्त संचालक अध्यादेशाला समविचारी आघाडीने न्यायालयात आव्हान दिले होते. समविचारी आघडीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात आज (9 नोव्हेंबर) सुनावणी झाली. गोकुळसंदर्भात औरंगाबाद खंडपीठातने निकाल जाहीर केला आहे. मंगळवारी ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक होणार असून निवडून आलेल्या 25 सदस्यासोबत शासनाने नियुक्त केलेले चारही सदस्य मतदान करणार आहे.
कोर्टाने दिलेल्या निकलात म्हटले की निवडून आलेल्या २५ सदस्यासोबत शासनाने नियुक्त केलेले ४ ही सदस्य मतदान करणार आहे. शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांची मतदान केलेली मते वेगळे ठेवले जाणार आहे. सर्व प्रक्रियेची व्हिडिओग्रफी केली जाणार असून निकाल जाहीर केले जाणार, अध्यक्षही निवडला जाणार आहे. राज्य शासनाकडून केलेली अध्यादेश स्थगिती मागणी फेटाळली आहे. अध्यादेश बरोबर की चूक हे अद्याप ठरले नाही, पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधिन राहणार आहे.
सरकार ताकदीच्या जोरावर बहुमत आणतंय. अध्यादेश म्हणजे सहकार क्षेत्राशी खेळ आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड जुन्या पद्धतीनेच व्हावी, असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. तर मुकुल रोहतगी यांनी सरकारकडून युक्तिवाद केला. यामध्ये राज्यसभेत नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकतात, मग सहकारी संस्था किंवा तत्सम संस्थांमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार का नसावा?, असा सवाल मुकुल रोहतगी यांनी उपस्थित केला निवडून आलेल्या २५ सदस्यासोबत शासनाने नियुक्त केलेले ४ ही सदस्य मतदान करणार करणार आहे.गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष शिघेला
गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष शिघेला पोहोचला आहे. शासन नियुक्त संचालकांना मतदानाच्या अधिकाराच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रम झाले. कोल्हापुरात दसरा चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला.. खासदार शाहू महाराज, सतेज पाटील, राजू शेट्टी, जयंत पाटलांसह मोठे नेते मोर्चात सहभागी झाले होते, यावेळी सर्वच नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर खडा प्रहार केला गोकुळवर 4शासननियुक्त संचालक नेमण्याचं पाप हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांचं असून, लोकशाहीवर घाला घालत असल्याची टीका सतेज पाटलांनी केली. त्याचसोबत महायुती सरकारन सूडबुद्धीने गोकुळवर प्रशासक नेमल्याचा आरोपही केला…
–गोकुळचा डाव पलटला, कोल्हापूरात बंटी पाटलांना मोठा झटका!
======——======