रत्नागिरीकरांना नाट्यमेजवानी सहयोग रत्नागिरीच्या वतीने नाट्यमहोत्सवाचे आयोजन३१ ऑक्टोबरला ‘सह्याद्रीला जेव्हा जाग येते’,१ नोव्हेंबरला ‘नटसम्राट’

रत्नागिरी दि.३०
सहयोग रत्नागिरी आणि कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार यांच्या वतीने दि.३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी रत्नागिरीतील मान्यवर मंडळीचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सहयोग रत्नागिरीच्या सचिव मनिषा बामणे आणि खजिनदार अनुजा पेठकर यांनी दिली.
दि.३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता सह्याद्रीला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.हा प्रयोग श्री देवी रामायसती कुंभारजुवा गोवा हि संस्था सादर करणार आहे.यावेळी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे,उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर,नगरसेवक सौरभ मलुष्टे,उद्योजक गणेश धुरी,डॉ.शहाणे आणि सहयोगचे अध्यक्ष दुर्गेश आखाडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.दि.१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नटसम्राट नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.हा प्रयोग साई पुर्वा आर्टस् गोवा हि संस्था सादर करणार आहे.यावेळी युवा उद्योजक अमेय वीरकर, ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे,प्रेमानंद कलशांवकर ,दादू पार्सेकर ,जयंत नाटेकर, भालचंद्र उसगांवकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.दोन्ही प्रयोग विनामूल्य असून प्रवेशिकासाठी दत्ता केळकर ( मो. 94200 51286) संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button