लांजा वृद्ध महिला हत्या प्रकरण: आरोपी प्रमोद खेडेकरच्या पोलीस कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ

लांजा: वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडी रामगाव परिसरात वृध्द महिलेचा खून करून सोन्याचे दागिने चोरल्याच्या प्रकरणातील आरोपी प्रमोद खेडेकर याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

लांजा तालुक्यातील वेरवली लाडवाडी येथे १९ ऑक्टोबर रोजी चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना लांजा पोलिसांनी संशयित प्रमोद खेडेकर याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली होती. तपासादरम्यान आरोपीने चोरीच्या उद्देशाने खून केल्याची कबुली दिली होती.

यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button