बालिकेवर अत्याचार; शिक्षकास जन्मठेप


गुहागर तालुक्यातील एका शाळेत दुसरी इयत्तेत शिकणाèया एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम शिक्षक उदय नामदेव वेल्हाळ याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी शुक्रवारी जन्मठेपेची आणि दंडाची शिक्षा सुनावली. सदर कामी सरकारी पक्षार्ते विशेष ज्येष्ठ सरकारी अभियाेक्ता पुष्पराज शशिकांत शेट्ये यांनी काम पाहिले.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2020 मध्ये पीडित बालिका दुसरीत शिकत हाेती त्यावेळी त्या वर्गाला शिकवण्यासाठी आराेपी उदय वेल्हाळ याची शिक्षक म्हणून नियुक्ती केली हाेती. 7 मार्च 2020 राेजी पीडित बालिका ही घरी गेल्यावर ती लंगडत चालत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. त्यावेळी तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता त्या बालिकेने आराेपी उदय वेल्हाळ याने तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराचा पाढा वाचला. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने गुहागर पाेलीस ठाण्यात दिलेल्या िफर्यादीनुसार शिक्षक उदय वेल्हाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button