
रत्नागिरीत ’काेल्ड चेन लाॅजिस्टिक्स’
काेकणचे अर्थकारण आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारा एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय काेकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. काेकणातील पहिला अत्याधुनिक ’काेल्ड चेन लाॅजिस्टिक्स’ प्रकल्प (शीतसाखळी वाहतूक व साठवणूक) रत्नागिरीत उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे काेकणातील आंबा, काजू, फळभाज्या आणि मुख्यत्वे मत्स्य व्यवसायाला आंतरराष्ट्रीय दर्जाची साठवणूक व जलद वाहतूक सुविधा उपलब्ध हाेणार आहे या प्रकल्पाचा फायदा केवळ काेकणापुरता मर्यादित न राहता लगतच्या काेल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांनाही माेठ्या प्रमाणावर हाेणार आहे. स्थानिक उत्पादने जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे काेल्ड स्टाेरेज व वातानुकूलित गाेदाम निर्मिती केली जाणार आहे. काेकण रेल्वेच्या नेटवर्कचा वापर करून शिजलेले, ताजे आणि टिकवण क्षमता कमी असलेले पदार्थ देशभरात आणि बंदरांपर्यंत जलदगतीने पाेहाेचवणे शक्य हाेणार आहे. माल उतरवण्यापासून ते अंतिम टप्प्यापर्यंत तापमानाचे नियंत्रण ठेवणारी विशेष वातानुकूलित व्हॅन आणि व्हेईकल्सब याद्वारे वाहतूक सुलभ हाेईल. काेकणातील जगप्रसिद्ध रत्नागिरी हापूस आंबा, काजू, फणस, आणि जांभूळ यांसारखी नाशवंत फळे याेग्य साठवणुकीअभावी खराब हाेण्याचे प्रमाण माेठे असते. या प्रकल्पामुळे हापूस आंब्याची साठवणूक तसेच थेट देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत वाहतूक करणे साेपे हाेईल.
रत्नागिरी व काेकण किनारपट्टीवरील काेळीबांधव आणि मत्स्य व्यावसायिकांसाठी हा निर्णय वरदान ठरणार आहे. ताजी मासेमारी टिकवून ठेवणे आणि ती इतर राज्यांमध्ये अथवा निर्यातीसाठी तात्काळ पाठवणे आता अधिक साेयीस्कर हाेणार आहे. काेल्हापूरचा गूळ, भाजीपाला, सांगलीची द्राक्षे व हळद आणि सातारची फळे, भाजीपाला यांनाही काेकण रेल्वेच्या या काेल्ड साखळीचा थेट फायदा मिळेल.




