
मुलींसाठी सुवर्णसंधीः ’डिजिटल मित्र’ माेफत काेर्ससाठी रत्नागिरीत प्रवेश सुरू
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल काैशल्ये ही राेजगाराची सर्वात माेठी गुरुकिल्ली बनली आहेत. याच धर्तीवर रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई शासकीय मुलींच्या औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) दहावी उत्तीर्ण मुलींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. संस्थेर्ते डिजिटल मित्र हा तीन महिन्यांचा अल्पमुदतीचा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, या अभ्यासक्रमासाठी 21 ऑक्टाेबरपासून प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे.
या उपक्रमाचे सर्वात माेठे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्णपणे माेफत असणार आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या काेणत्याही विद्यार्थिनीला यामध्ये प्रवेश घेता येईल. तीन महिन्यांच्या या प्रात्यक्षिक प्रशिक्षणादरम्यान मुलींना आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणि राेजगाराभिमुख काैशल्यांचे धडे दिले जातील. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाèया सर्व उमेदवारांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ या सरकारमान्य संस्थेकडून अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. या प्रमाणपत्रामुळे मुलींना भविष्यात विविध क्षेत्रांत नाेकरीच्या तसेच स्वयंराेजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध हाेतील.
डिजिटल क्षेत्रातील राेजगाराच्या वाढत्या संधींचा विचार करता, जास्तीत जास्त पात्र विद्यार्थिनींनी या माेफत संधीचा लाभघ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी htts://msbsvet.edu.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन आपली नाेंदणी पूर्ण करायची आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती किंवा थेट मार्गदर्शनासाठी विद्यार्थिनी राणी लक्ष्मीबाई आयटीआय संस्थेला भेट देऊ शकतात, किंवा एम. एम. दळी (9970432742) आणि ए. ए. दाभाेळकर (7387416958) या शिल्पनिदेशकांशी संपर्क साधू शकतात.




