सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर, देवरुखच्यावतीने “वसुंधरा ऑलिंपियाड: २०२६”चे २१ नोव्हेंबर रोजी आयोजन

 देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर, देवरुखच्यावतीने शनिवार दि.२१ नोव्हेंबर, २०२६ रोजी दुपारी १:०० ते ४:०० या वेळेत "वसुंधरा ऑलिंपियाड:२०२६" या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ४थी ते १२वी या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ४ विविध गटांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. वसुंधरा ऑलिंपियाडमध्ये पर्यावरण प्रश्नमंजुषा स्पर्धेसह पर्यावरण पूरक घोषवाक्य व पोस्टर निर्मिती स्पर्धा संपन्न होणार आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धा बहुपर्यायी प्रश्न(MCQ) स्वरूपात असणार असून, या स्पर्धेसाठी नकारात्मक गुणांकन असणार नाही. 
 पर्यावरण प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पेपर मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमातून एकत्रित असणार आहे. प्रश्नमंजुषा पर्यावरण, विज्ञान, शाश्वत विकास आणि भविष्य या प्रमुख मुद्द्यांवर समाविष्ट असून, या स्पर्धेमध्ये पर्यावरण व जैवविविधता, जलसंवर्धन, नवीकरणीय ऊर्जा, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, वन व वन्यजीव संवर्धन, विज्ञान व शाश्वत विकास या विषयावर आधारित असणार आहे. विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्यावर स्पर्धक विद्यार्थ्यांना 'मॉडेल क्वेश्चन सेट' आयोजकांकडून पाठवला जाणार आहे. 'वसुंधरा ऑलिंपियाड' स्पर्धेसाठी चार गट असून त्यांची विभागणी स्थर १: इ. ४थी ते ५वी, स्थर २: इ.६वी ते ८वी, स्थर ३: इ. ९वी व १०वी, स्थर ४: इ. ११वी व १२वी अशी करण्यात आली आहे.     
 पर्यावरण प्रश्नमंजुषा स्पर्धेसह पर्यावरण पूरक घोषवाक्य व पोस्टर निर्मिती स्पर्धा यावेळी संपन्न होणार आहे. पोस्टर निर्मिती स्पर्धेसाठी स्पर्धकांना १ तासाचा अवधी दिला जाणार असून आयोजकांकडून ३०"x२२" साईजचा कार्डबोर्ड पेपर पुरवला जाणार आहे. सदर स्पर्धेसाठी रंग साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे. तर घोषवाक्य स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी घोषवाक्य स्पर्धा स्थळी तयार करायचे आहे. घोषवाक्य स्पर्धेसाठी आयोजकांतर्फे पेपर पुरवला जाणार आहे. सहभागी स्पर्धकांनी सोबत 'रायटिंग पॅड' आणणे अपेक्षित आहे. संपूर्ण स्पर्धांचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर थोड्या वेळानंतर जाहीर केला जाणार आहे. सदर स्पर्धेसाठी नाव नोंदणी  https://forms.gle/ywJAQZiXyYNwrvB3A या लिंकवर रविवार दि. १ नोव्हेंबर, २०२६ पर्यंत करायची आहे.
या स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांना व शाळांना आकर्षक रोख बक्षीसे, प्रशंसा प्रमाणपत्रे आणि सहभाग प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. सर्व स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी पदकाने सन्मानित केले जाणार आहे. सर्व स्तरांवर सर्वाधिक गुणवंत विद्यार्थी असलेल्या शाळेला विशेष चषक दिला जाणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी विशेष प्रशंसा प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी माफक नोंदणी शुल्क ₹ ५०/- ठेवण्यात आले आहे.  शाळांनी सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी  ८०८७७०८३८० या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. चंद्रशेखर केदारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button