
खेड जगबुडी, नारिंगीसह नद्या पडल्या कोरड्या
एरव्ही दुथडी भरून वाहणार्या जगबुडी, नारिंगीसह तालुक्यातील ग्रामीण भागातील नद्यांचे पात्र अक्षरशः कोरडे पडले आहे, परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ आणि गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तीव्र उन्हामुळे नद्यांनी तळ गाठला आहे. यामुळे पाणीटंचाईचे नवे संकट उमे राहण्याच्या शक्यतेने ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
खेडची जीवन वाहिनी मानल्या जाणार्या जगबुडी नदीपात्रात जिथे पाण्याचा प्रचंड प्रवाह असायचा, तिथे सद्यस्थितीत दगड-धोडे, कोरडी वाळू आणि भेगा पडलेली जमीन दिसत आहे. तालुक्यातील लहान-मोठ्या उपनद्या व ओढ्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पात्रातील पाण्याचे छोटी साचलेली डबकीही आता आदू लागली आहेत. ग्रामीण भागातील पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या विहिरीही पार सुकल्पा असून विंधन विहिरीतूनही केवळ हवाच बाहेर येत आहे.




