
रौप्यपर्व….श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीरौप्य महोत्सवी शुभारंभ कार्यक्रम
रौप्य महोत्सव म्हणजे केवळ पंचवीस वर्षांचा प्रवास नव्हे, तर ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून घडलेल्या असंख्य स्वप्नांचा, संस्कारांचा आणि यशोगाथांचा अभिमानास्पद सोहळा!पाली गावातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण स्थानिक
पातळीवर उपलब्ध व्हावे या विचाराने आदरणीय अण्णा सामंत यांनी या संस्थेचं बीज रोवलं. ही संस्था २५ वर्षांची झालेय.
या रौप्य महोत्सवी शुभारंभ कार्यक्रमाच्या अनुषंगाने नव्या पिढीला मराठी साहित्याबद्दल विचार ऐकायला मिळावेत याकरिता,९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भूषविलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे आपल्या भेटीला येणार आहेत. १२ कादंबऱ्या,९ कथासंग्रह,६ व्यक्तीचित्रणं,६ समीक्षा हे त्याचं लेखन साहित्य आजवर प्रकाशित झालं आहे. तब्बल ३६ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आपले विचार, अनुभव ते नव्या पिढीसमोर मांडणार आहेत. *शनिवारी दि. २४ ऑक्टोबर ला सकाळी ९:३० वाजता डी. जे. सामंत महाविद्यालय व इंग्लिश मिडीयम स्कूल पाली इथे ते आपल्याशी संवाद साधणार आहेत.
रौप्य महोत्सवी शुभारंभ कार्यक्रमाकरिता आपणही आवर्जून उपस्थित राहण्याकरिता हे आग्रहाचं निमंत्रण....- स्थळ : डी. जे. सामंत महाविद्यालय व इंग्लिश मिडीयम स्कूल
पाली, रत्नागिरी
वेळ : सकाळी ९:३० वा.*



