विशेष मतदार नोंदणी शिबिर 17, 18, 24 व 25 ऑक्टोबर रोजी, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 26 ऑक्टोबर


दापोलीः- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष सखोल पुनरीक्षण 2026 अंतर्गत मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 17, 18, 24 व 25 ऑक्टोबर रोजी ही शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 26 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.
मतदार यादीत आपल्या नावाची नोंद आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी तसेच मतदार यादीतील आवश्यक सुधारणा व दुरूस्ती करण्यासाठी नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेता येणार आहे. ज्या नागरिकांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नाही, अशा नागरिकांनी या विशेष शिबिरांमध्ये सहभागी होऊन मतदार नोंदणीसाठी आवश्यक अर्ज सादर करावेत. लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी आपल्या नावाची मतदार यादीत नोंद असल्याची खात्री करून घ्यावी. नाव नसल्यास किंवा नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास विहित मुदतीत आवश्यक अर्ज सादर करून नोंदणी व दुरूस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button