यावर्षीपासून खानदेशी आणि विद्यार्थी साहित्य संमेलनाचं आयोजन :- ना. उदय सामंत

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह – २०२६’ या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.

महाराष्ट्रातील स्थानिक बोलीभाषांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी भाषा विभाग सातत्यानं प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षीपासून खानदेशी साहित्य संमेलन भरविण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केली. तरुणांमध्येही साहित्याची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने मराठी भाषा विभागाच्या वतीने विद्यार्थी साहित्य संमेलनाचंही आयोजन करण्याचा मानस यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु डॉ. एस. टी. इंगळे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र तथा विचारधारा प्रशाळाचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रविण महाले यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button