
ग्रामपंचायत भगवतीनगर येथे नदीवर बंधारा बांधून पाणी अडविण्याचा उपक्रम एकाच दिवशी बांधले तीन बंधारे
ग्रामपंचायत भगवतीनगर येथे नदीवर पाणी अडवून जलसंधारणाच्या उद्देशाने बंधारा घालण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पावसाचे पाणी अडवून त्याचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी तसेच परिसरातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक ग्रामस्थ तसेच कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यासह इतर संवर्गाचे कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांनी एकत्र येत श्रमदानातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम लोकसहभागातून जलसंवर्धन करण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि आरोग्य कर्मचारी यांच्या एकजुटीतून गावाच्या विकासासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.




