दुष्काळामुळे मुंबई, पुण्यासह अनेक शहरांत पाणीकपात! वाचा राज्यातील थेट घडामोडी!

:* पुणे शहरात आजपासून (गुरुवार, दि. १५) आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पुणे महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे पुणेकरांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. दुसरीकडे, नाशिक महापालिकेनेही शहरासाठी आणि कुंभमेळ्यासाठी मिळून सुमारे ८ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. १५ ऑक्टोबरनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या संर्दभातील बैठक होणार आहे.*साताऱ्यातील विजयादशमी सोहळा साधेपणाने*राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील ऐतिहासिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा यंदा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींचे भान राखत जलमंदिर पॅलेस येथील शाही सोहळ्यातील झगमगाट टाळण्याचा महत्त्वाचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे.*सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी*दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती. प्रत्यक्षात दिवाळीपूर्वी अवघ्या पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button