प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण मार्गावर कोकण रेल्वे महामंडळाकडून सुरक्षा उपाय


कोकण रेल्वे मामविरून प्रवास करणार्‍या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या १८ महिन्यांच्या कालावधीत धावत्या रेल्वेगाड्यांमधील चोरी, पाकिटमारी, दागिने आणि मोबाईल लांबवण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. रेल्वे सुरक्षा बल, शासकीय रेल्वे पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्यातील उत्तम समन्वय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कोकण रेल्वे मार्ग आता प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित बनत चालला आहे. नाईट पेट्रोलिंगसह स्कॉडही तैनात असून हॉटस्पाट’ रेल्वेगाड्यांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षात कोकण मार्गावर रात्रीच्या वेळी धावणार्‍या लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये परराज्यातील आणि स्थानक चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. विशेषतः मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास क्रॉसिंगसाठी याबणार्‍या गाड्या अन् झोपेच्या अधीन गेलेले प्रवासी हेरून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे प्रकार वाढीस लागले होते. मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली होती. विशेषतः चोरट्यांनी एक्स्प्रेस गाड्यांनाच ’लक्ष्य’ यामुळे प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली होती.
स्थानिक पोलीस ऍक्शन मोडवर या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल, शासकीय रेल्वे पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखैचह स्थानिक पोलीस ऍक्शन मोडवर येत रात्रगस्तीला सर्वाधिक प्राधान्य दिले. मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय उपकरण नोंदणी प्रणालीचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली. मोबाईल गहाळ किंवा चोरीला जाताच त्याचा आयएमइआय क्रमांक तात्काळ ब्लॉक करून लोकेशन ’ट्रॅक’ केले जात आहे. यामुळे गेल्या वर्षभरात शेकडो मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button