रत्नागिरीतील समुद्रात एलईडी मासेमारीचा धुमाकूळ, खात्याकडून कारवाई नाही


रत्नागिरी येथील समुद्रात रात्रीच्या वेळी एलईडी दिव्यांच्या प्रकाशातील व परवाना नसलेल्या मिनी पर्ससीन नौकांकडून जोरदार मासेमारी सुरु झाल्याची चर्चा मच्छीमार बांधवांमध्ये सुरू झाली आहे. किनार्‍यालगत अशाप्रकारे मासेमारी होत असून शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी समुद्रात विद्युत रोषणाई सारखे दृश्य दिसत असल्याची चर्चा शहर परिसरात सुरू झाली आहे.
एलईडी प्रकाशातील मासेमारीला परवानगी नाही. परंतु रत्नागिरीच्या समुद्रात यंदा लवकरच एलईडी प्रकाशातील मासेमारी सुरु झाली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे मासेमारी करणार्‍या नौकांच्या मासळीला अपेक्षित दर मिळणे कठीण झाले आहे.
एलईडी मासेमारी करणार्‍या नौका मासळी पकडून सकाळी मत्स्य व्यवसाय विभागाचे कार्यालय सुरु होण्यापूर्वी मिरकरवाडा बंदरात आणून उतरवली जात आहे. या अवैध मासेमारीमुळे कायदेशीर मासेमारी करणार्‍या नौकांच्या मासळीला चांगला दर मिळेनासा झाल्याने मच्छीमार संघटना संतप्त झाल्या आहेत. एकाही मिनी पर्ससीन नेट नौकांना मासेमारी परवाना नाही. या नौका नजरेल दिसतील अशा ठिकाणी म्हणजेच तडीला मासेमारी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button