चेतन खांडेकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी.

रत्नागिरी : आर. पी. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय व आर. व्ही. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालयातील (स्वायत्त) संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणाऱ्या चेतन खांडेकर यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.

जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचे लागू पेन्शन योजनेवर आधारित गुंतवणूक प्राधान्यक्रम या विषयावर संशोधन पूर्ण केले. त्यांना गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य सीएमए डॉ. मकरंद साखळकर यांनी संशोधनकार्यात मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. डॉ. खांडेकर हे चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयात लेखाशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉ. चेतन खांडेकर यांचे अभिनंदन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, पदाधिकारी, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.

संशोधनामध्ये चेतन खांडेकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या जुन्या व नवीन निवृत्तीवेतन योजनांनुसार मिळणाऱ्या लाभांचा अभ्यास करून, पेन्शन योजनेतील लाभांवर आधारित कर्मचाऱ्यांचे बदलणारे गुंतवणूक प्राधान्यक्रम याचा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास सादर केला आहे.

जुन्या व नवीन निवृत्तीवेतन योजनेमधील मिळणाऱ्या लाभांबद्दल कर्मचाऱ्यांमधील जागरूकता, वृद्धापकाळासाठी तरतूद करण्याचे नियोजन, विमा खरेदीचे उद्देश व गुंतवणुकीतील जोखीम व्यवस्थापनाबद्दल मत याबद्दलचा अभ्यास श्री चेतन खांडेकर यांनी प्रबंधांमध्ये मांडला आहे. कर्मचाऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शेअर मार्केट व म्युच्युअल फंडांचा परिपूर्ण अभ्यास करूनच हे पर्याय निवडावे, असे मत त्यांच्या प्रबंधात मांडले आहे. तसेच शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक नियोजनाची गरज त्यांनी या अभ्यासातून अधोरेखित केली आहे. या अभ्यासातून विविध सरकारी खात्यांमधील जुन्या व नवीन निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना गुंतवणूक विषयक, विमा विषयक पर्याय निवडण्यासाठी मदत मिळू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button