
चिपळूण शहरातील अग्निशमन दलाची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत
चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानालगत असणारी अग्निशमन दलाची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. असे असल्याने या इमारतीचा मद्यपींचा वावर असल्याचे चित्र आहे. विशेषतः अंधार पडताच याठिकाणी मद्यपींची पाऊले वळत असल्याचे दिसून येत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण न झाली आहे.
नगर परिषदेने करोडो रुपये खर्चुन अग्निशमन दलाची स्वतंत्र इमारत बांधली आहे. त्याचे २०१८ रोजी उ्द्घाटन झाले गेले कित्येक वर्षापासून ही इमारत वापराविना असून काही अंशी तीची पडझड तसेच इमारतीवर वेलींचे आच्छादन निर्माण झाले आहे. यातूनच या इमारतीची देखभाल होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे इमारतीठिकाणी काही मद्यपी दारू पिण्यासाठी बसत असल्याचे चित्र आहे. शिवाय अग्निशमन वाहन उभे करण्यासाठी असणार्या मोकळी जागेत अनेकजन सिगारेटचे झुरके मारत असल्याचे दिसून येत आहे. अंधार होताच याठिकाणी मद्यपींचा वावर असतो वा इमारतीचा योग्य वापर नगरपरिषद करण्यादृष्टीने प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. याशिवाय मद्यपी तसेच सिगारेटचे झुरके मारणार्यावर मनाई करण्याच्यादृष्टीने ठोस उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




