खड्ड्यामुळे कुंभार्ली घाटातील ट्रकचे दोन्ही टायर फुटले, वाहतूक ठप्प


कुंभार्ली घाटातील खड्डेमय रस्त्यामुळे मालवाहू ट्रकचे दोन्ही टायर फुटल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यात कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी मुख्य रस्त्यावर टक थांबल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक तब्बल दोन तास पूर्णतः ठप्प झाली होती. अखेर क्रेनच्या सहाय्याने फुटलेले टायर बदलण्यात आल्यानंतर ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
हा मालवाहू ट्रक कुंभाली घाटामार्गे घाटमाथ्याच्या दिशेने जात होता. या घाटातील रस्ते पूर्णतः उखडले असून त्यावरून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. असे असतानाच बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खड्यातून जातेवेळी मालवाहू ट्रकचे दोन्ही टायर फुटले. फुटलेल्या टायरमुळे मुख्य रस्त्यावर हा ट्रक थांबल्याने अन्य वाहनास ये-जा करण्यास पुरेशी जागा न मिळल्याने यामुळे कुंभार्ली घाटातील दोन्ही बाजूकडील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. हा टक साहित्यांनी पूर्णपणे भरलेला असल्याने जॅकच्या सहाय्याने टायर बदलणे शक्य नसल्याने अखेर क्रेनला पाचारण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button