
मराठवाड्यातील गुरांना चारा आणि कोकणातील वणवा समस्येवर मात बाबत निवेदिता प्रतिष्ठान चे मुख्यमंत्र्यांना पत्र
दापोली :- मराठवाड्यातील गुरांना चारा आणि कोकणातील वणवा समस्येवर मात या बाबत निवेदिता प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृह तथा महसूल मंत्री यांना पत्राद्वारे सुजाव सुचवण्यात आले आहेत.
त्यानुसार मराठवाड्यात दुष्काळामुळे गुरांच्या चाऱ्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून निवेदिता प्रतिष्ठान चे माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि दापोली खेड मंडणगड मतदारसंघाचे आमदार तसेच राज्यमंत्री योगेश दादा कदम
त्यांना ईमेल द्वारे निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात, कोकणात चारा उपलब्धता भरपूर आहे पण कापणीला माणसे नाहीत आणि तो चारा खायला तेवढ्या प्रमाणात गुरेही नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील कामगारांना कोकणात छावण्या उभारून माळराने तसेच रस्त्यांच्या बाजूला उगवलेले गवत आणि डोंगरावरील प्रचंड गवत कापणी करावी आणि ते गवत क्रश करून मराठवाड्यातील गुरांना खाद्य म्हणून पाठवावे.क्रश केल्याने वहातूक खर्चही कमी होईल. तसेच कोकणातील गवत काढणीमुळे कोकणाला लागलेल्या मानवनिर्मित शापावर अर्थात वणवा समस्येवर आपोआप मात करता येईल….मराठवाड्यातील कामगारांना रोजगार मिळेल आणि गुरांना खाद्यही मिळेल.असा तिहेरी फायदा होऊ शकतो . असे नमूद करण्यात आले आहे.
वरील प्रमाणे शासनाने तातडीने उपाययोजना केल्यास पुढील तीन महिन्यात मराठवाड्यातील गुरांच्या चाऱ्याला काही प्रमाणात तरी पर्याय उपलब्ध होईल असा आशावाद निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रशांत परांजपे यांनी व्यक्त केला आहे.




