‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत रत्नागिरी डाक विभागाकडून थिबा पॅलेस व धूतपापेश्वर परिसरात स्वच्छता मोहीम


रत्नागिरी, दि. २९ ): भारत सरकारच्या ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ अंतर्गत रत्नागिरी डाक विभागाच्यावतीने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा पॅलेस तसेच राजापूर येथील प्रसिद्ध धूतपापेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. डाक विभागाने यंदाच्या अभियानासाठी “स्वच्छता में सहभाग: स्वच्छ भारत, विकसित भारत” ही संकल्पना निश्चित केली आहे. या संकल्पनेनुसार आणि जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटनस्थळे व वर्दळीच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने ही मोहीम राबविण्यात आली.
विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध टपाल कार्यालयांतील ७५ हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. थिबा पॅलेस हे रत्नागिरीचे महत्त्वाचे ऐतिहासिक वारसास्थळ असल्याने येथे देश-विदेशातून पर्यटक भेट देतात. या ऐतिहासिक वारसास्थळाचे जतन व्हावे आणि पर्यटकांसाठी स्वच्छ व सुंदर वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने थिबा पॅलेस परिसर चकाचक करण्यात आला. या मोहिमेसाठी नगर परिषद आणि पुरातत्व विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याच अनुषंगाने, राजापूर उपविभागातील टपाल कर्मचाऱ्यांनी धूतपापेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून धार्मिक व पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.
विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन:
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या अभियानांतर्गत रत्नागिरी डाक विभागातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

  • स्वच्छ सागर, सुरक्षित सागर (SSSS): १९ सप्टेंबर रोजी मांडवी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
  • जन भागीदारी वेस्ट कार्यक्रम: २४ सप्टेंबर रोजी जी.जी.पी.एस. शाळा, रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
  • एक दिन, एक घंटा, एक साथ: १ ऑक्टोबर २०२६ रोजी टपाल कर्मचाऱ्यांचे ऐच्छिक श्रमदान होणार आहे.
  • स्वच्छ भारत दिवस: २ ऑक्टोबर २०२६ रोजी विभागीय कार्यालय, रत्नागिरी येथे “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले जाईल.
    ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ हे केवळ परिसर स्वच्छ करण्यापुरते मर्यादित नसून ती एक सामूहिक जबाबदारी आणि लोकचळवळ आहे. नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button