रत्नागिरी पर्यटन संस्थेतर्फे १५ जणांना पर्यटन मित्र पुरस्कार

रविवारी होणार वितरण

रत्नागिरी: रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित आणि समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई) व पर्यटन संचालनालयातर्फे जागतिक पर्यटन दिनी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ जणांचा विशेष सत्कार करणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.

येत्या रविवारी (ता. २७) जागतिक पर्यटन दिनानिमित्त सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये सौ. शहनाज अश्फाक काझी (वैद्यकीय पर्यटन), ययाती शिवलकर (होम स्टे मिऱ्या), आनंद तायशेटे (पर्यटन), गौरव जोशी (होम स्टे, कोतवडे), महेंद्र मयेकर (हॉटेल रत्नदुर्ग), प्रसाद देवस्थळी (कोकण कोस्टल व गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजक), भरत मोरे (इको क्लब, खेड), मानसी यादवराव (कोकण वॉयज), गौरेश फाळके (हॉटेल नीलम), ओम पाडाळकर (फोटोग्राफर), सौ. अमृता करंदीकर (अमृता ट्रॅव्हल्स), राधेय पंडित (युट्यूबर, हेरीटेज एक्स्पर्ट), सुदेश शेट्ये, सतीश कदम (दोघेही पत्रकार), संजय वैशंपायन (पर्यटनासाठी योगदान) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण पालकमंत्री डॉ. उदय सामंत, आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत, डॉ. श्रीधर ठाकूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, डॉ. चंद्रशेखर निमकर, संजय यादवराव आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

पर्यटक प्रेमी व पर्यटन व्यावसायिक तसेच टुरिस्ट गाईड, टुरिस्ट गाड्यांचे व्यावसायिक व स्थानिक नागरिक, हॉटेल व्यावसायिक, आंबा बागायतदार, होम स्टे, हाऊस बोट व्यावसायिक, कोकणातील स्थानिक कलाकार, पर्यटन सहकारी संस्थांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय यादवराव, सुहास ठाकुरदेसाई, नंदू तांबे, मकरंद केसरकर, कातळशिल्पतज्ञ भाई रिसबुड यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button