
माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह दोघांवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा
कल्याण : मदतीचे आमिष दाखवून २२ वर्षीय विवाहित तरुणीला भिवंडीतील बापगाव येथील फार्महाऊसवर नेऊन शस्त्राचा धाक दाखवत अत्याचार केल्याच्या आरोपावरून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, पतीसोबतच्या वादात मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने तिला फार्महाऊसवर नेण्यात आले. तेथे तिला जबरदस्तीने दारू पाजून अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने कांचन कुलकर्णी यांच्याकडे मदत मागितल्यानंतर त्या तिला घेऊन पोलिसांकडे गेल्या. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.



