
बाप्पाचा नैवेद्य… आता थेट गरजवंतांपर्यंत!
गणपतीला नैवेद्य म्हणून आलेल्या मिठाईचे काय करायचे कळत नाहीये का?.. तर हा मेसेज तुमच्याचसाठी
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा
गणपती उत्सवात घरी येणाऱ्या पाहुण्यांना यावेळी बाप्पासाठी बाजारातील मिठाईऐवजी सुका मेवा (ड्रायफ्रूट्स), चिक्की, खजूर यांसारखे पौष्टिक व टिकाऊ पदार्थ आणण्यास सांगा.
उत्सवानंतर हा सगळा बाप्पाचा प्रसाद एकत्र करून खाली दिलेल्या संकलन केंद्रांपैकी तुमच्या सोयीच्या ठिकाणी जमा करा.
आमचे स्वयंसेवक हा पौष्टिक खाऊ चिपळूण व खेड तालुक्यातील दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये कुपोषणाशी झुंज देणाऱ्या बालकांपर्यंत व गरजवंत कुटुंबांपर्यंत पोहोचवतील.
💛 इच्छुकांना वाहतूक खर्चासाठीही आर्थिक योगदान देता येईल.
🌱 आमच्याविषयी — सेवासाधना प्रतिष्ठान
गेल्या दशकाहून अधिक काळ रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत.
📌 यावर्षीचे काही ठळक उपक्रम:
✅ ८९ शाळांमध्ये १००+ कार्यशाळा — विज्ञान, भूगोल, पर्यावरण विषयांवर
✅ आरण्यक येथे ५ निवासी शिबिरे संपन्न
✅ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवठा
शिक्षण केवळ परीक्षेपुरते न राहता रोजच्या जीवनाशी जोडले जावे, एक संवेदनशील व जागरूक पिढी घडावी — हेच आमचे ध्येय! 🌍
🙏 यंदा बाप्पाचा प्रसाद गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याच्या या उपक्रमात सहभागी व्हा. तुमच्या छोट्याशा योगदानातून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलू शकतो.
प्रसाद संकलन केंद्र whatspp संपर्क –
चैतन्य (अंधेरी) – 9820546326
संदिपजी (दादर) – 9820612519
सीमा (घाटकोपर) – 9763687826
प्राची (चेंबूर) – 7718858440
लिना (विक्रोळी) – 9987529738
शर्मिला (कांजूरमार्ग) – 9004055927
विनायक (ठाणे) – 8369702558
मंगेश (चिपळूण) – 82089 30954
📞 संपर्क: 99875 29738
🌐 www.sevasadhanapratishthan.org
▶️ YouTube: Sevasadhana Pratishthan
हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा 🙏
गणपती बाप्पा मोरया! 💛🌿




