२९ सप्टेंबरला देवरुख येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’


रत्नागिरी, दि. ९ ) : महाराष्ट्र राज्य कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता देवरुख येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’चे आयोजन करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा कॉलेज ऑफ फिट अँड डिझाइन (D CAD), भागवत संकुल, मधली आळी, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे पार पडेल.
इच्छुक उमेदवारांसाठी आवाहन
रोजगार मिळविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व अनुभवानुरूप योग्य संधी मिळविण्यासाठी https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर जाऊन आपली नावनोंदणी करावी.
उद्योजक व आस्थापनांसाठी नोंदणी
तसेच विविध कंपन्या, नियोजक व आस्थापना यांनी आपल्याकडील रिक्त पदांनुसार पात्र मनुष्यबळाची निवड करण्यासाठी https://forms.gle/Mrz8Gc3ofqq37wwr6 या लिंकवर नोंदणी करून रिक्त पदांची माहिती सादर करावी, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी आणि उद्योजकांनी या रोजगार महाकुंभाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button