गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत रिक्षा भाडेदरांचे फलक लावले

प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे व मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचे रिक्षाचालकांना मार्गदर्शन

आज रोजी आगामी गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, मारुती मंदिर, आरोग्य मंदिर, साळवी स्टॉप तसेच रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे भेट देऊन रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे भाडे आकारणे, प्रवाशांशी सौजन्याने वागणे तसेच कोणत्याही प्रकारचे वादाचे प्रसंग टाळणे याबाबत आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
माहितीस्तव.

रत्नागिरी : आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रत्नागिरी शहरातील प्रमुख रिक्षा थांब्यांवर शेअर ए-रिक्षा थांबे व दरपत्रकाची माहिती देणारे फलक तसेच ऑटो-रिक्षा भाडे दरपत्रकाचे फलक लावण्यात आले आहेत.

आज रोजी शेअर ए-रिक्षा थांबे व दरपत्रकाची माहिती देणारे फलक तसेच ऑटो-रिक्षा भाडे दरपत्रकाचे फलक रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानक रिक्षा थांबा, मारुती मंदिर रिक्षा थांबा व रत्नागिरी रेल्वे स्टेशन रिक्षा थांबा येथे लावण्यात आले.

रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानक रिक्षा थांबा, मारुती मंदिर रिक्षा थांबा तसेच रत्नागिरी रेल्वे स्टेशन रिक्षा थांबा येथे हे फलक लावण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा व शेअर ए-रिक्षाचे निर्धारित भाडेदर सहजपणे समजू शकणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, मारुती मंदिर, आरोग्य मंदिर, साळवी स्टॉप तसेच रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा थांब्यांना भेट दिली. यावेळी रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे भाडे आकारावे, प्रवाशांशी सौजन्याने वागावे आणि कोणत्याही प्रकारचे वादाचे प्रसंग टाळावेत, अशा आवश्यक सूचना देण्यात आल्या.

गणेशोत्सवाच्या काळात शहरात तसेच रेल्वे आणि बस स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना चांगली व सुरळीत सेवा मिळावी, यासाठी रिक्षाचालकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button