
जिल्हास्तरीय कोस्टल मॅरेथॉन उत्साहात संपन्न ,हजारो स्पर्धक धावले
एकतेचा संदेश आणि निरोगी आरोग्याचा मंत्र यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील लोकांनी उत्साहाने भाग घेतला देशाला एकतेचा संदेश या मॅरेथॉनमधून देण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पहिल्यांदाच असा उपक्रम आयोजित केला या स्पर्धेला सामाजिक संस्था अनेक औद्योगिक कंपन्या यांचे सहकार्य लाभले या स्पर्धेत महाविद्यालयीन तरुण वर्गावरच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, माजी निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत आदिजण उपस्थित होते .जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी कुटुंबीयांसह सहभाग घेतला याशिवाय शहरातील उद्योजक, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी याच्यापासून ७५ वर्षांच्या वृद्धापर्यंतया सर्वांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन ते पूर्ण केली.हजारो नागरिक उत्साहाने यामध्ये सहभागी झाले होते . सकाळपासून शहरातील वातावरण मॅरेथॉन मय झाले होते .
www.kontoday.com