
चिपळूणचा उड्डाणपूल केवळ गणेशोत्सवासाठी सुरू करून नंतर दोन महिने बंद ठेवणार
मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा चिपळूणचा उड्डाणपूल मणेशोत्सवात कोकणात येणार्या चाकरमान्यांसाठी अवघ्या आठवडाभराकरिता सुरू करण्यात येणार असून त्यानंतर तो उर्वरित कामांसाठी दोन महिने बंद ठेवण्यात येणार असल्याचे अधिकृत वृत्त हाती आले आहे. इतक्या कमी कालावधीसाठी उड्डाणपूल सुरु करण्यासाठी इतका अट्टाहास का केला जातोय ? असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय. दरम्यान काल प्रांताधिकारी आकाश लिगाडे, डीवायएसपी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे या वरिष्ठ अधिकार्यांनी उड्डाणपुलाची पाहाणी केली.
चिपळूणमधील उड्डाणपुलाचे सध्या हॉटेल अतिथीपासून पुढे ४६० मीटर जोडरस्त्याचे काम अत्यंत युद्धपातळीवर दिवसरात्र सुरु आहे. त्यापैकी केवळ १३० मीटर लांबीचे भरावाचे काम शिल्लक आहे. अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण कार्यालयातून देण्यात आली. बहादुरशेख पुलाप्तसून या उड्डाणपुलाच्या सुरूवात होते. बहादरशेख पुलापासून पुढे ९० मीटरचा जोडरस्ता पूर्ण झाला आहे. २०२३ साली गर्डर कोमन्नूर झालेल्या दुर्घटनेनंतर ठेकेदार उपकंपनी बदलण्यात आली आणि काहीशा विलंबाने काम पुन्हा सुरू झाले.




