अंजनारी घाटात भरधाव ट्रक पलटी; चालकाचा मृत्यू


मुंबई-गोवा महामार्गावरील तीव्र उतारावर भीषण अपघात; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल


लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी घाटात तीव्र उताराच्या ठिकाणी भरधाव ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम सिंग (वय ५८, रा. सुकरताल, उत्तर प्रदेश) हे आपल्या ताब्यातील एचआर ३८ एक्स ०९९३ क्रमांकाचा ट्रक घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने स्लाइडिंगचे साहित्य घेऊन जात होते.

लांजा तालुक्याच्या हद्दीतील अंजनारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी ट्रक आल्यानंतर भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक महामार्गावर पलटी झाला.

या अपघातात चालक श्याम सिंग गंभीर जखमी झाले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button