
भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत केंद्रातर्फे पठण स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या विस्तारसेवा मंडळ आणि भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे संस्कृत सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा बुधवारी (ता. २) केंद्रात झाल्या. रत्नागिरी व चिपळूणच्या शाळांमधील व खुल्या गटातून महाविद्यालयीन व रत्नागिरीकर अशा १५० जणांनी सहभाग नोंदवला.
स्तोत्रपठण स्पर्धेकरिता वैशाली दळी व ओंकार खांडेकर, संस्कृत गीतगायन स्पर्धेसाठी पौर्णिमा साठे व स्वरदा लोवलेकर, गीतापठण स्पर्धा शालेय गटाकरिता अक्षया भागवत व मेधा घाणेकर व खुल्या गटाकरिता मीरा नाटेकर व प्रीती टिकेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रश्नमंजूषा स्पर्धेकरिता रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी परीक्षण केले.
बक्षीस वितरणाला संचालक डॉ. दिनकर मराठे, प्रा. कश्मिरा दळी, प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. रिया बिष्ट, उपकेंद्रातील प्रकल्प सहाय्यक सई ओक आणि जान्हवी पाध्ये, कक्ष अधिकारी प्रथमेश घोसाळे, कार्यालय सहाय्यक करण कीर व लिपिक अपर्णा कोकरे, कल्पजा जोगळेकर व सुरक्षारक्षक रोहित घोसाळे तसेच समन्वयक स्वरूप काणे आणि सहभागी स्पर्धक व स्थानिक रत्नागिरीकर उपस्थित होते.
स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे (प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमाने)- स्तोत्रपठण- शालेय गट- नचिकेत बाम, नमिता सागवेकर, ज्ञानदा नातू, उत्तेजनार्थ- गार्गी देवल व आदिती गद्रे आणि सिद्धांत मराठे. खुला गट- चिन्मयी सरपोतदार, भाविक कांबळी, स्वरा गवाणकर, उत्तेजनार्थ- पूर्वा जोशी. संस्कृत गीतगायन स्पर्धा- शालेय गट- ओवी आंबेकर, आदिती गद्रे, सिद्धांत मराठे. उत्तेजनार्थ- मनस्वी कबीर व ईरा बोरवणकर. खुला गट- अनघा जोगळेकर, द्वितीय विभागून- नयन आंबेकर व चिन्मयी सरपोतदार, तृतीय- गंधार नाईक व विशेष पुरस्कार- स्वरा लिंगायत, रिद्धी लिंगायत, सिद्धि लिंगायत, साक्षी धोंडगा, ईशा भोई आणि अमृता नवाथे. गीता पाठांतर स्पर्धा (१५ वा अध्याय)- शालेय गट- शुभ्रा केतकर, विभागून द्वितीय- रिया काजरेकर आणि गार्गी देवल, विभागून तृतीय- गार्गी काणे व सारा महाजन. खुला गट- अनघा जोगळेकर, सुरेखा जोशी, श्रुती बोरवणकर, उत्तेजनार्थ- रुद्रांश लोवलेकर. प्रश्नमंजुषा स्पर्धा- मार्लेश्वर गट, हरिहरेश्वर, विश्वेश्वर. यात एकूण ३५ जणांनी सहभाग घेतला.
बक्षीस वितरणावेळी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी सांगितले की, संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतविषयक आवड, ज्ञान आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळाले. संस्कृत भाषेची रुजवणूक अधिक परिणामकारक पद्धतीने झाली. संस्कृत साहित्य व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा, गीता १५ वा अध्याय मुखोद्गत स्पर्धा, संस्कृत गीत गायन स्पर्धा आणि महागणेशपंचरत्न स्तोत्र पठण स्पर्धा अशा चार स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




