
रत्नागिरी जिल्ह्यात १५२० गावानी गाठला स्वच्छतेचा टप्पा
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने ग्रामीण स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. जिल्ह्यातील एकूण १५३३ महसुली गावांपैकी तब्बल १५२० गावे ’ओडीएफ प्लस’ म्हणून ऑनलाइन घोषित झाली आहेत. त्यामुळे हगणदारीमुक्त आणि स्वच्छ गावांच्या या मोहिमेत जिल्ह्याने मोठी झेप घेतली आहे. दि. १८ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. चिपळूण तालुक्यातील सर्व १६५ गावे ’ओडीएफ प्लस’ झाली आहेत.




