कारवांचीवाडी फाटा ते कुवारबाव येथे वाहतुकीस अडथळा करणार्‍या तीन वाहन चालकांवर गुन्हा


रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा ते कुवारबाव जाणार्‍या रस्त्यावर आणि एमआयडीसी येथील जी.एफ कंपनी ते एफ.सी.आय गोडावूनकडे जाणार्‍या रस्त्यावर इतर वाहनांना अडथळा व धोका निर्माण होईल अशा पध्दतीने वाहने उभी केली. याप्रकरणी तीन चालकांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी ११.४५ ते १.२५ या कालावधीत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल बाळकृष्ण बाळकृष्ण सागवेकर (४६, रा. सोनारवाडी हातखंबा, रत्नागिरी), सलिम पैगंबर मुल्ला (३०, रा. गुलाबवाटिका रवींद्रनगर कारवांचीवाडी, रत्नगिरी) आणि अमोल दत्ताराम खोसरे (३६,रा. हनुमाननगर मिरजोळे, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशतिय चालकांची नावे आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button