अंतरवाली सराटीत आजपासून मनोज जरांगेंच्या आमरण उपोषण!

Manoj Jarange Live : मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देण्याची मागणी जरांगे यांनी केलीय.

यासाठी त्यांनी सरकारला 28 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यानं जरांगे आजपासून उपोषण करणार आहेत. सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात होईल. दरम्यान, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आज जरांगेंची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button