श्री एकमुखी दत्त मंदिर भव्य रील्स स्पर्धेत सम्यक दीक्षा दीपक मोहिते याला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर

रत्नागिरी : शहरातील श्री एकमुखी दत्त मंदिर (घुडेवठार, चवंडेवठार, पाटीलवाडी, विलणकरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी तालुका मर्यादित भव्य रील्स स्पर्धेत सम्यक दीक्षा दीपक मोहिते याने उत्कृष्ट सादरीकरण करत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकवले आहे.
या स्पर्धेसाठी ‘हरिनाम सप्ताह माझ्या एकमुखी दत्ताचा’ हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत सम्यक याने अत्यंत भक्तीभावाने व कल्पकतेने रील सादर करून उपस्थितांची व परीक्षकांची मन जिंकली. त्याच्या या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत आयोजकांच्या वतीने त्याला सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक स्वीकारल्यानंतर सम्यक याने श्री एकमुखी दत्त मंदिर देवस्थान आणि सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण स्पर्धेमुळे स्थानिक कलाकारांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केले. सम्यक याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button