ओबीसी ‘क्रिमीलेयर’ निकषाबाबत १ सप्टेंबरला सुनावणी!

नवी दिल्ली : नागरी सेवा परीक्षा २०२५ मधील उमेदवारांसाठी इतर मागासवर्गीय ‘क्रीमी लेयर’ निकषांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारने दाखल केलेल्या स्पष्टीकरण याचिकेवर सर्वोच्च न्यायालय १ सप्टेंबर रोजी सुनावणी करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळानुसार, न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. आर. महादेवन यांचे विशेष खंडपीठ १ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जोयमाल्या बागची आणि न्या.व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या या मागणीची दखल घेत विशेष खंडपीठ स्थापन करण्यास सहमती दर्शवली होती.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली की, कार्मिक व प्रशिक्षण विभागाने एका निकाला लागलेल्या प्रकरणात तातडीच्या निर्देशांसाठी अर्ज दाखल केला असून त्यावर न्या. नरसिंहा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी करणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button