
ना. एकनाथ शिंदे कॉंग्रेसमध्ये येणार होते; हुसेन दलवाईं यांच्या दाव्यामुळे खळबळ
मुंबई कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी ना. एकनाथ शिंदे कॉंग्रेसमध्ये येणार होते मात्र कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांचा प्रवेश होऊ दिला नव्हता, असा दावा केला आहे. यावर माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि आमची चर्चा झाली होती. मात्र काय झाली ते सांगणार नाही, असे चव्हाण म्हणाले.
एकनाथ शिंदे आमचे मित्र आहेत ते आमचं काम करीत नाहीत मात्र आजही आमचे मित्र आहेत ते आमच्या जिल्ह्यातले आहेत. आमच्या अनेक गाठीभेटी झाल्या होत्या मात्र त्यावर मी बोलणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.




