
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांची रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे ‘चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी २०२६’ या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला सदिच्छा भेट….

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सलग 5 व्या वर्षी भरविण्यात आलेल्या ‘चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी २०२६’ या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला.


यावेळी उपस्थितांशी बोलतांना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी खेळ हा माणसाच्या जीवनाला एक नवी दिशा देतो, शिस्त शिकवतो आणि जिद्द निर्माण करतो. आज या मैदानावर खेळाडूंचा जोश, त्यांचा उत्साह आणि त्यांच्यातील खरी ‘खेळाडूवृत्ती’ पाहून मला मनापासून आनंद झाला आहे.. पराभवाने खचून न जाता आणि विजयाने हुरळून न जाता सातत्य ठेवणे हेच एका चांगल्या खेळाडूचे लक्षण आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. खेळाडूंना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कायम त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पारितोषिक मिळवलेल्या सर्व विजेत्या खेळाडूंचा गौरव केला. तसेच उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल श्री. दीपक पवार यांचे अभिनंदन केले.




