तणावमुक्त राहा, सदैव हसतमुख जगा, मेडिकेअर कंपनीचे सीईओ जु जंग तै


आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येक व्यक्ती विविध प्रकारच्या ताणतणावातून जात आहे. जीवनात कितीही अडचणी आणि समस्या आल्या, तरी ताणतणावापासून दूर राहून आनंदी जीवन जगावे आणि सदैव हसतमुख राहावे, असा संदेश हॅप्पी मेडिकेअर कंपनीचे दक्षिण कोरियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जु जंग तै यांनी रत्नागिरीकरांना दिला.
रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील हॅप्पी मेडिकेअर सेंटरला जु जंग तै आणि कंपनीचे इंडियन डायरेक्टर राजीव सिंग यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी जु जंग तै यांनी कोरियन भाषेत मिश्किल आणि खुमासदार शैलीत संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या भाषणाचे हिंदीत भाषांतर राजीव सिंग यांनी केले. या भेटीच्या निमित्ताने जु जंग तै आणि राजीव सिंग यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. केंद्रातील कर्मचारी तसेच थेरपी घेणार्‍या रत्नागिरीकरांनी पारंपरिक पोशाखात परदेशी पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले. या स्वागताने जु जंग तै आणि राजीव सिंग भारावून गेले. केंद्राचे संचालक प्रभाकर शिंदे यांनी जु जंग तै आणि राजीव सिंग यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी जु जंग तै यांनी थेरपी घेणार्‍या लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button