चिपळूण तालुक्यातील तुरंबवमधील वृद्धेचा सर्पदंशाने मृत्यू


चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथे घराची साफसफाई करत असताना सर्पदंश झाल्याने ७९ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्य झाल्याची घटना रविवारी घडली. सुमित्रा तुकाराम सावर्डेकर असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमित्रा सावर्डेकर या घराची साफसफाई करीत असताना त्यांना सापाने दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button