
बेळगांव-खानापूर न्यायालयाचा निकाल
रामदास कदम-नितीन बानगुडे पाटील यांची २० वर्षानंतर मुक्तता


रत्नागिरी
२००६ साली सिमा प्रश्नाबाबत बेळगांव, धारवाड, निपाणी, बिदरीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांना बेळगावमध्ये पाठविले होते. त्यावेळी बेळगांव खानापूर येथे प्रचंड मोठी जाहिर सभा झाली होती. त्याआधी बेळगांव येथील मराठी महापौर यांच्या तोंडाला काळे फासण्याचे कामही काही कन्नड मुंडांनी केले होते. त्या धर्तीवरती शिवसेना प्रमुख यांच्या आदेशानुसार बेळगांव येथे जाऊन रामदास कदम नितीन बानगुडे पाटील यांनी सभा घेतली होती. यावेळी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक शासनावर भाषणातून हल्लाबोल केला होता. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलग वीस वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल लागला आहे. सुनावणी पूर्ण झाल्यावर ११ ऑगस्ट रोजी खानापूर न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर येथे २००६ साली सीमा प्रश्नासंदर्भात मेळावा घेण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील नेते या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी मा. रामदास कदम आणि मा. नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक शासनावर भाषणातून हल्लाबोल केला होता. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाची सुनावणी पूर्ण होऊन खानापूर न्यायालयाने मा. रामदास कदम आणि मा. नितीन बानगुडे पाटील यांची मंगळवार दि. ११ ऑगस्ट, २०२६ रोजी निर्दोष मुक्तता केली आहे. वकील शामसुंदर पत्तार, हेमराज बेंच्चन्नावर यांनी काम पाहिले.
२००६ साली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्नासंदर्भात मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे नेते व
माजी मंत्री रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला होता. या प्रक्षोभक भाषणाच्या विरोधात खानापूर पोलीसांनी मा. रामदास कदम आणि मा. नितीन बानगुडे पाटील यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम १५३ आणि १५३/ए अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयाची सुनावणी खानापूर न्यायालयात सुरू होती.
रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील हे या सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे खानापूर न्यायालयाने या दोघांवर पकड वॉरंट जारी केले होते. यावेळी समिती कार्यकर्ते यशवंत बिरजे आणि महादेव घाडी यांनी कोर्टात जामीन राहिले होते. त्यावेळी खानाापूर न्यायालयाने रू. १० लाख रूपयाच्या जामीनावर रामदास कदम यांना सोडले होते. आता या दोन्ही नेत्यांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे




