
जुनी पेन्शन संघटनेतर्फे विस्तार अधिकारी व केंद्र समन्वयकांचा भव्य सत्कार; संघटनेच्या शिलेदारांसाठी ‘खेळ पैठणीचा’ आणि फनी गेम्स आयोजन.
रत्नागिरी – महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शाखा रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील नूतन शिक्षण विस्तार अधिकारी व विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या केंद्र समन्वयकांचा भव्य सत्कार सोहळा, डॉ. मधुरा सावंत यांचे आरोग्य मार्गदर्शन तसेच विविध स्पर्धांचे आयोजन फाटक हायस्कूल येथील सभागृहात उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल अलकटवार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कार्याध्यक्ष तुकाराम मुरकुटे यांनी केले.
या सोहळ्यात नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या कॉमन पूल शिक्षण विस्तार अधिकारी महेश कांबळे, सारीका शिंदे व केंद्र समन्वयकांचा त्यांच्या विद्यार्थीभिमुख व गुणवत्तापूर्ण कार्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी नवनियुक्त केंद्र समन्वयकांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करण्यात आले. आदर्श शिक्षक अंकलगे सर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण, जिल्हा सचिव दत्तात्रय क्षीरसागर, महिला आघाडी प्रमुख विभा बाणे यांनी आपल्या मनोगतातून नूतन अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास चिपळूण तालुकाध्यक्ष अविनाश जाधव यांची उपस्थिती होती.
सत्कार सोहळ्यानंतर महिला शिक्षकांसाठी ‘खेळ पैठणीचा’ तर पुरुष शिक्षकांसाठी ‘फनी गेम्स’ चे आयोजन करण्यात आले होते.
खेळ पैठणीचा मध्ये
प्रथम क्रमांक सौ. माधुरी अनिकेत शिंदे पाटील द्वितीय क्रमांक शिवशाला लक्ष्मण सोनटक्के यांनी पटकावला पुरुषांच्या
फनी गेम्स मध्ये प्रथम क्रमांक संजीवन पांडूरंग दराडे द्वितीय क्रमांक नवनाथ तानाजी वाळवेकर यांनी पटकावला.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा निवेंडी केंद्राच्या केंद्र समन्वयक अमृता इनामदार व कळझोंडी केंद्राच्या केंद्र समन्वयक प्राजक्ता पाटील, दत्तात्रय क्षीरसागर, राहुल अलकटवार, तुकाराम मुरकुटे,रामनाथ बने, गणपती पडुळे, अवधूत शिंदे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची उत्कृष्ट तयारी व नियोजन जुनी पेन्शन संघटना रत्नागिरी तालुका कार्यकारिणी व महिला आघाडीने केले होते. जुनी कार्यक्रमासाठी खास थीम सॉंग तयार करून कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रामदास चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तालुका सरचिटणीस अवधूत शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



