मंडणगडमध्ये भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक

बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्याचे पदाधिकाऱ्यांना आवाहन; आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन

खेड : मंडणगड येथील महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट सभागृहात भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत पक्षाच्या आगामी संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी विविध राजकीय व सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर आणि भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. बूथ स्तरावर संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे राबवून पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी भाजपा रत्नागिरी जिल्हा महामंत्री तथा गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, अजय दळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, प्रसाद मांडवकर, भाजपा दापोली महिला मोर्चा तालुकाध्यक्षा जया ताई साळवी, भाजपा दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, शशांक सिनकर, भाजपा सोशल मीडिया दापोली तालुका संयोजक धिरज पटेल, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले, भाजपा सोशल मीडिया खेड शहर प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम, पक्षाची तळागाळातील बांधणी आणि बूथनिहाय कामकाज अधिक गतिमान करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून आगामी काळात अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बैठकीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक गती देण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button