चिपळूण येथील एका प्रकरणात पत्नीला दरमहा सव्वा लाख पोटगी देण्याचे आदेश


चिपळूण येथील एका प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय देत एका विवाहित महिलेला आणि तिच्या दोन मुलांना दरमहा एकूण १ लाख २० हजार रुपयांची अंतरिम पोटगी मंजूर केली आहे. कौटुंबिक वादाच्या या प्रकरणात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी खेड येथील प्रसिद्ध वकील ऍड. सुधीर शरद बुटाला यांनी प्रभावी युक्तिवाद केला, ज्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.
चिपळूणमधील एका महिलेने हक्काच्या व कायदेशीर पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. खटल्याचा अंतिम निर्णय येईपर्यंतच्या खर्चासाठी आणि दैनंदिन निर्वाहासाठी अंतरिम पोटगी मिळावी म्हणून हा अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणी दरम्यान ऍड. सुधीर बुटाला यानी न्यायालयासमोर वस्तुस्थिती मांडत सबळ पुरावे आणि कायदेशीर मुद्दे प्रभावीपणे सादर केले. पतीची आर्थिक सच्छिद्रता आणि कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन न्यायालयाने ऍड. बुटाला यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, संबंधित महिलेला स्वतःच्या निर्वाहासाठी दरमहा ५० हजार रुपये, तिच्या दोन मुलांना प्रत्येकी ३० हजार रुपये म्हणजेच दोन्ही मुलांसाठी एकूण ६० हजार रुपये आणि राहत्या घरभाड्यासाठी स्वतंत्र १० हजार रुपये दिले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button