
मोबाईल चोरटा ताब्यात
दापोली एस.टी. बस स्थानकात एस.टी.ची वाट पाहात असलेल्या तरूणीच्या सॅकमधील मोबाईल लांबविणार्या चोरट्यास दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मानसी फिलसे नावाची तरूणी सोमवार रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास एस.टी.ची वाट पहात दापोली एस.टी. बस स्थानकात उभी होती. यावेळी मोबाईल तिने आपल्या सॅकमध्ये ठेवला होता. मात्र काही वेळाने पाहिले असता तिच्या सॅकची चेन उघडून आतील मोबाईल अज्ञाताने चोरून नेल्याचे तिच्या निदर्शनास आले. याबाबत तिने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दापोली पोलीस ठाण्याचे एएसआय शांताराम रहाटे व हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड यांच्या पथकाने एस.टी. आगारातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित संतोष सतिष आंगडी पवार (३२, रा. मूळ बेळगांव, सध्या नांगरबुडी, दापोली) याला ताब्यात घेतले.
www.konkantoday.com