
नगरपरिषदेच्या वाहनाला रत्नागिरी नगर परिषदेच्या कामाचा फटका, नगरपरिषदेचा टँकरच रस्त्याच्या बाजूच्या चरात रुतला
रत्नागिरी नगरपरिषदे कडून पावसा आधी विविध कामे केल्याचे दावे केले जात होते परंतु अनेक ठिकाणी नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत होते रस्त्याची अपुरे कामे व साईड पट्ट्यांच्या तकलादूकामामुळे नागरिकांना वाहन चालवताना व चालताना नागरिकांना मोठा त्रास होत होता आता तर नगरपरिषदे जवळील आंबेडकर पुतळ्याजवळ आज सकाळी साडेसात वाजता नगरपरिषदेचा टँकरच रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड पट्टीत चरात रुतल्या चा प्रकार घडला आहे सतत फुटत असलेल्या पाणी योजनेच्या पाईपलाईन मुळे व अन्य कामामुळे चर खणले जात आहेत मात्र त्याच्यावर वर माती टाकली जात आहे त्यामुळे असे प्रकार घडत आहेत त्यामुळे एकूणच नगरपरिषदेचा कामाचा दर्जा आता नगरपरिषदेच्या वाहनानेच उघड केला आहे




