
म्हाळोजीराजे घोरपडे समाधीस्थळाच्या विकासाला गती, माजी आमदार आ. विनय नातू यांची समाधी स्थळाला भेट
रत्नसिंधू समृद्ध योजनेचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार आ. विनय नातू यांनी संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले येथील ऐतिहासिक म्हाळोजीराजे घोरपडे यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन परिसराची पाहाणी केली. यावेळी समाधीस्थळाचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आ. नातू म्हणाले की, संगमेश्वर तालुक्यातील कसबा, कळंबस्ते, फणसवणे, कारभाटले, नायरी, तिवरे, शृंगारपूर आणि निवळी या गावांना समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या संपूर्ण ऐतिहासिक पट्ट्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी शासनाने कृती आराखडा तयार केला असून, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदही प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेचा सातत्याने पाठपुरावा करून ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.




